मोबाईल विश्व

WhatsApp Tricks

10 WhatsApp Tricks- व्हाट्सअँप चे 10 ट्रिक्स माहिती आहेत का?

0 0

होय मान्य बाबा, तुम्ही व्हाट्सअँप फार वर्षांपासून वापरत आहात. पण काय तुम्हाला खालील 10 WhatsApp Tricks व्हाट्सअँप ट्रिक्स किंवा युक्त्या, क्लृप्त्या माहिती आहेत? प्रत्येक ट्रिक वापरून पहा आणि 10 पैकी तुम्हाला किती ट्रिक्स पहिल्यापासूनच माहिती होत्या ते कमेंट मध्ये लिहा.

WhatsApp Tricks
 • सर्वप्रथम हे निश्चित करा कि तुम्ही लेटेस्ट व्हर्जन व्हाट्सअँप वापरात आहात. म्हणजेच या ट्रिक्स करण्यापूर्वी तुमचा व्हाट्सअँप उपडेट करा.
 • इंटरनेट कनेक्शन सुरु आहे हे निश्चित करा.
 • मोबाईलची बॅटरी किमान २०% तरी चार्ज असावी यापेक्षा जास्त असेल तर अति उत्तम.

चला तर मग सुरु करूया …

WhatsApp Tricks
 1. व्हॉट्सअप रीड रिसीट्स Read Receipts (उर्फ ब्लू टिक्स) कसे अक्षम करावे?
WhatsApp Tricks

तुम्ही WhatsApp मेसेज वाचला कि अजून नाही वाचला, हे मेसेज पाठवणाऱ्याला ब्लु टिक वरून म्हणजेच रीड रिसिप्ट वरून कळते. जर मेसेज पाठवणाऱ्याला तुम्ही तो मेसेज वाचला, हे कळू द्यायचे नसेल तर हि ट्रिक तुम्ही नक्कीच वापरा. पण लक्षात ठेवा कि जर तुम्ही हि ट्रिक वापरली आणि रीड रिसिप्ट सेटिंग बदलली तर तुम्हाला, तुम्ही पाठवलेल्या मॅसेजची रीड रिसिप्ट मिळणार नाही. ट्रिक विचारपूर्वक वापरा.

 • व्हाट्सअँप ओपन करा
 • मेनू मधून सेटिंग Setting उघडा
 • प्रायव्हसी Privacy ऑप्शन निवडा
 • रीड रिसिप्ट Read Receipt चे बटन शोधा आणि ते टॅप करून बंद करा
 • बस्स मग काय झाली बंद तुमची ब्लु टिक ची कीटकीत एकदाची.

2. व्हॉट्सअॅपवर तुमचा प्रोफाईल फोटो कसा लपवायचा?

WhatsApp Tricks

खूप लोकांना आपला किंवा कोणताच फोटो व्हाट्सअँप प्रोफाइल वर ठेवायला आवडत नाही. महिला , वयस्क , अंतर्मुख लोक शक्यतो असे करतात. पण आपल्यापैकी खूप जणांना हे कसे करायचे हे माहीतच नसते. खालील स्टेप्स वापरून तुम्ही व्हाट्सअँप डीपी ब्लँक ठेवू शकता. ट्रिक विचारपूर्वक वापरा.

 • व्हाट्सअँप उघडा
 • सेटिंग मध्ये जा
 • प्रायव्हसी वर क्लिक करा
 • प्रोफाइल फोटो ऑप्शन निवडा
 • नोबडी सिलेक्ट करा
 • तुमचा प्रोफाइल फोटो ब्लँक झालेला असेल.काही ग्रुप खूपच ऍक्टिव्ह असतात म्हणजेच त्यावर सारसारखी पोस्ट येत असतात. त्यामुळे महत्वाच्या वेळी हे आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकते. सारख्या येणाऱ्या नोटिफिकेशन्स मुले आपले ध्यानही भटकते. मग याला उपाय काय? डोन्ट वरी मोबाईल मराठी हा संभ्रम दूर करेल. खालील स्टेप्स करा आणि तुमच्यासाठी योग्य म्यूट पर्याय काळजीपूर्वक निवडा

3. व्हॉट्सअॅप ग्रुप चॅट्स म्यूट कसे करावे?

WhatsApp Tricks

काही ग्रुप खूपच ऍक्टिव्ह असतात म्हणजेच त्यावर सारसारखी पोस्ट येत असतात. त्यामुळे महत्वाच्या वेळी हे आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकते. सारख्या येणाऱ्या नोटिफिकेशन्स मुळे आपले ध्यानही भटकते. मग याला उपाय काय? डोन्ट वरी मोबाईल मराठी हा संभ्रम दूर करेल. खालील स्टेप्स करा आणि तुमच्यासाठी योग्य म्यूट पर्याय काळजीपूर्वक निवडा.

 • व्हाट्सअँप ओपन करा
 • तुमच्या आवडीच्या ग्रुप चॅटवर टॅप करा
 • त्यानंतर ग्रुप इन्फो सिलेक्ट करा किंवा काही मोबाईल्स मध्ये डायरेक्ट म्यूट नोटिफिकेशन पर्याय दिसतो Tap kara.
 • तुम्हाला आठ तास, एक आठवडा किंवा वर्षभर चॅट म्यूट करण्याचा पर्याय मिळेल.
 • तुम्हाला त्या ग्रुप चे नोटिफिकेशन किती वेळेसाठी बंद करायचे आहे हे निवडा
 • मग काय झाले बंद ते किर किरी करणारे ग्रुप नोटिफिकेशन्स बंद तुम्ही ठरवलेल्या काळासाठी

4. WhatsApp वर लोकेशन कसे शेअर करावे?

WhatsApp Tricks

तुम्ही तुमच्या मित्राला कुठे भेटायचे याबद्दल दिशानिर्देश देण्याचा प्रयत्न करत असल्यास, तुम्ही त्यांना तुमच्या वर्तमान स्थानाचे लोकेशन टाकू शकता आणि गुगल मॅप वापरून त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवू शकता. तुम्ही अद्याप तेथे नसल्यास, तुम्ही त्यांना तुम्ही कोठे जात आहात याचे देखील लोकेशन पाठवू शकता. त्यांना तुमच्या मार्गातील हालचालींचा मागोवा घेण्यासाठी तुमचे ‘लाइव्ह लोकेशन’ शेअर करू शकता. या ट्रिक द्वारे तुम्ही 15 मिनिटे, 1 तास किंवा 8 तासांच्या निवडीसाठी त्यांना तुमचे स्थान प्रसारित करेल. चॅटमधील “स्टॉप शेअरिंग” या पर्यायावर क्लिक करून तुम्ही जेव्हा हवे तेव्हा लोकेशन शेअरिंग समाप्त करू शकता.

 • व्हाट्सअँप ओपन करा
 • अटॅचमेंट मेनू (पेपर पिन सिम्बॉल) उघडा
 • लोकेशन सिम्बॉल वर टॅप करा
 • तुमचे जीपीएस लोकेशन ऑन करा
 • लाईव्ह लोकेशन किंवा रेग्युलर लोकेशन सेंड करा
 • तुमच्या मित्राला तुमचे लोकेशन सेंड झालेले असेल

5. Last Seen लास्ट सीन कसे लपवावे?

WhatsApp Tricks

Last Seen लास्ट सीन कसे लपवावे जर लास्ट सीन हे ऑप्शन ऑन असेल तर तुमच्या मित्राला तुम्ही व्हाट्सअँप मेसेज पहिलाच नाही अशी थाप नाही मारू शकणार कारण त्याला तुमचा लास्ट सीन ऑन व्हाट्सअँप चा टाइम लागेचच दिसेल आणि तुमच्यामध्ये दुरावा आणि अविश्वास वाढू शकतो. खालील ट्रिक वापरून तुम्ही लास्ट सीन बंद / चालू करू शकता.

 • व्हाट्सअँप ओपन करा
 • सेटिंग मध्ये जा
 • प्रायव्हसी ऑप्शन निवडा
 • लास्ट सीन आणि ऑनलाईन ऑप्शन निवडा
 • यामध्ये नोबडी ऑप्शन निवडा
 • तुमचे लास्ट सीन दिसणे बंद झालेले असेल

6. व्हाट्सअँप वर व्हाईस मेसेज कसे पाठवाल

WhatsApp Tricks

जर तुम्ही काही काम करत असाल आणि व्हाट्सअँप वर मेसेजला टाईप करून रिप्लाय देणे अवघड वाटत असेल तर तुम्ही व्हॉइस मेसेज सुद्द्धा पाठवू शकता.

 • व्हाट्सअँप ओपन करा
 • ज्याला व्हॉइस मेसेज पाठवायचा आहे त्याचा चॅट ओपन करा
 • आता मोबाईलच्या खालील भागात उजव्या बाजूला माईक सारखे चिन्ह दिसेल त्याला पकडून ठेवा
 • मोबाईल तुमच्या तोंडाजवळ पकडून तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे हे थोडक्यात बोला
 • तुमच्या आवाजात हा मेसेज रेकॉर्ड होऊन तुमच्या मित्राला पाठवला जाईल

7. WhatsApp मध्ये तुमच्या जुन्या चॅट चा बॅकअप कसा घ्यावा?

WhatsApp Tricks

तुमचे जुने वर्षभरातील चॅट्स गमावण्याची चिंता करू नका. या ट्रिक चा वापर करून तुम्ही तुमचे जुने चॅट्स क्लाउड वर सेव करून निश्चिन्त होऊ शकता. तुमचे जुने वर्षभरातील चॅट्स गमावण्याची चिंता करू नका. या ट्रिक चा वापर करून तुम्ही तुमचे जुने चॅट्स क्लाउड वर सेव करून निश्चिन्त होऊ शकता. तुमचा मोबाईल हँडसेट बदलला असेल तरीपण नवीन हँडसेट मध्ये क्लाऊडच्या साहाय्याने तुम्ही जुने मेसेज रिस्टोर करू शकता.

 • व्हाट्सअँप ओपन करा
 • सेटिंग्ज उघडा
 • चॅट सिलेक्ट करा
 • चॅट बॅकअप वर जा
 • तुम्हाला Google ड्राइव्ह बॅकअप सेट करू देईल.
 • पुढच्या वेळी तुम्ही कोणत्याही डिव्‍हाइसवर WhatsApp इंस्‍टॉल कराल, तेव्हा तुमचे सर्व अद्ययावत संदेश थेट क्लाउडवरून तुमच्या डिव्‍हाइसमध्‍ये इंजेक्ट करण्‍यासाठी तुम्ही सेटअप स्क्रीनवर Google Drive बॅकअप पर्याय निवडू शकता.

8. विडिओ कॉल करताना डेटा कसा वाचवाल ? कोणती सेटिंग कराल जेणेकरून तुमचा भरपूर डेटा वाचेल, कमी जीबी चा रिचार्ज लागेल

WhatsApp Tricks

WhatsApp द्वारे विडिओ कॉल करणे अतिशय सोयीचे आहे. परंतु ते खूप डेटा देखील वापरू शकते. डेटाच्या कमतरतेच्या समस्या असलेल्या आपल्यापैकी सर्वांना हि ट्रिक फार फायद्याची आहे.

 • व्हाट्सअँप ओपन करा
 • सेटिंग मध्ये जा
 • स्टोरेज आणि डेटा ऑप्शन निवडा
 • युज लेस डेटा फॉर कॉल्स ऑप्शन ऍक्टिव्ह करा
 • आता तुमच्या विडिओ कॉल साठी खूप कमी देता लागेल

9. WhatsApp मध्ये मेसेज अनरीड (न वाचलेले) म्हणून कसे चिन्हांकित करावे

WhatsApp Tricks

जर तुम्हाला मेसेज वाचण्याची सवय असेल पण रिप्लाय द्यायला विसरला असेल, तर त्यांना न वाचलेले म्हणून चिन्हांकित करा जेणेकरून तुम्हाला नंतर त्यांच्याकडे लक्ष जाईल. किंवा तुम्ही तुमच्या मित्राला अरे तुझा मेसेज वाचलाच नाही म्हणूनही थाप मारू शकता हाहा.

 • व्हाट्सअँप ओपन करा
 • संबंधित व्यक्तीच्या चाट आयकॉनला थोडे वेळ दाबून धरा
 • उजव्या बाजूला वरती ऑप्शन्स वर क्लीक करा (३ टिम्ब असणारा सिम्बॉल)
 • मार्क अनरिड ऑप्शन दिसेल तो निवडा
 • तुमचा तो मेसेज रीड चा अनरिड झालेला असेल

10. तुमच्या न वाचलेल्या Unread मेसेजची संख्या नाहीशी करा.

WhatsApp Tricks

खूपदा अनेक WhatsApp मेसेज वाचायचे राहून जातात. ते तसेच महिनो नि महिने वाचायचे पडून राहतात आणि नंतर बिनकामी बनतात.पण असे अनरिड मेसेजची संख्या मोठी असेल तर ती संख्या आपल्याला वारंवार दिसत राहते. अशा बिनकामी , जुन्या मेसेजला एका दमात रीड करण्यासाठी खालील ट्रेक वापरा.

 • व्हाट्सअँप ओपन करा
 • कोणत्याही एका चॅट वर बोट धरून ठेवा
 • उजव्या बाजूला वरती ऑप्शन्स वर क्लीक करा (३ टिम्ब असणारा सिम्बॉल)
 • Select All ऑप्शन निवडा
 • कोणत्याही एका चॅट वर बोट धरून ठेवा ऑप्शन निवडा
 • परत एकदा उजव्या बाजूला वरती ऑप्शन्स वर क्लीक करा (३ टिम्ब असणारा सिम्बॉल)
 • Mark as Read चे ऑप्शन दिसेल त्याला क्लीक करा
 • तुमचे सर्व जुने अनरिड मेसेज साफ झालेले असतील

मोबाईल मराठी चे खाली दिलेले फेसबुक पेज लाईक करा धन्यवाद.

https://www.facebook.com/profile.php?id=100063662022280

शेतीविषयक आंतरराष्ट्रीय आर्टिकल वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Genius Farmer – Farmers Support

Why ‘Target Groups (TG)’ are important to Mobile Companies? (mobilemarathi.com)

मोबाईल मराठी वर माहितीचा खजिना उपलब्ध आहे. खालील ब्लॉग तुम्ही वाचून ज्ञानप्राप्ती करू शकता

1. ‘मोबाईल मराठीकशासाठी ?

Why Mobile Marathi? – मोबाईल मराठी 6 August 2023

2. Why ‘Target Group (TG)’ are important to Mobile Companies? ‘TG-टार्गेट ग्रुपसर्व मोबाईल कंपन्यांसाठी का महत्वाचे आहेत ?

Why ‘Target Groups (TG)’ are important to Mobile Companies? (mobilemarathi.com)

3. OnePlus Nord 3 Design Leak. To be launched in July 2023. वनप्लस नॉर्ड 3 5G ची डिझाईन लीक. हा आकर्षक मोबाईल पहिला का?

OnePlus Nord 3 5G Design Leaked – mobilemarathi.com

4. Mobile Tricks- मोबाईल ट्रिक्स भाग

Mobile Tricks- मोबाईल ट्रिक्स भाग १ – मोबाईल मराठी – 2023 (mobilemarathi.com)

5. Track lost Mobile- मोबाईल हरवला, चोरीला गेला तर काय कराल?

Track lost Mobile- मोबाईल हरवला, चोरीला गेला तर काय कराल? (mobilemarathi.com)

6. 5G vs 4G Technology – 5G विरुद्ध 4G तंत्रज्ञान

5G vs 4G Technology – 5G विरुद्ध 4G तंत्रज्ञान – – 2023 (mobilemarathi.com)

7. 10 WhatsApp Tricks- व्हाट्सअँप चे 10 ट्रिक्स माहिती आहेत का?

10 WhatsApp Tricks- व्हाट्सअँप चे 10 ट्रिक्स माहिती आहेत का? (mobilemarathi.com)

8. Nothing Phone 2 पाहिलात का ? किंमत जाणून घ्या

Nothing Phone 2 पाहिलात का ? किंमत जाणून घ्या – मोबाईल मराठी (mobilemarathi.com)

9. WhatsApp वरून मोठी फाईल आणि व्हिडीओ पाठवा– Send Big size file and video on WhatsApp

WhatsApp वरून मोठी फाईल आणि व्हिडीओ पाठवा- Send Big size file and video on WhatsApp (mobilemarathi.com)

10. Best Mobiles Under 25000

Best Mobiles Under 25000 – मोबाईल मराठी – 5 August 2023 (mobilemarathi.com)

11. Vivo Vs Samsung: Who is Better?

Vivo Vs Samsung: Who is Better? – मोबाईल मराठी 6 August 2023 (mobilemarathi.com)

12. Vivo Y21 is best budget mobile

Vivo Y21 is best budget mobile – मोबाईल मराठी 6 August 2023 (mobilemarathi.com)

13. Chat GPT Login in Marathi

Chat GPT Login in Marathi – मोबाईल मराठी – 6 August 2023 (mobilemarathi.com)

14. OnePlus foldable phone in India

OnePlus foldable phone in India – 6 August 2023 (mobilemarathi.com)

15. JCB Mobile Announced

JCB Mobile Announced – मोबाईल मराठी 2023 (mobilemarathi.com)

16. Vivo Y36 Launched in India

Vivo Y36 Launched in India – मोबाईल मराठी (mobilemarathi.com)

17. Samsung mobile under 20000

Samsung mobile under 20000 – mobilemarathi.com 2023

18. Oppo Reno 10 Pro Price in India

Oppo Reno 10 Pro Price in India – August 2023 # (mobilemarathi.com)

19. Iphone 14 Pro Max price in Dubai

Iphone 14 Pro Max price in Dubai – 2023 Mobile in Marathi (mobilemarathi.com)

20. Best 5G Mobiles under 15000 in India

Best 5G Mobiles under 15000 in India – 6 August 2023 (mobilemarathi.com)

21. Best 5 Mobile under 15000 in India

Best 5 Mobile under 15000 in India August 6 August 2023 (mobilemarathi.com)

22. Mobile Phone in Marathi मोबाईल फोनची माहिती.

Mobile Phone in Marathi – mobilemarathi.com

23. Vivo V29 Pro details in Marathi

Vivo V29 Pro details in Marathi – 6 August 2023 (mobilemarathi.com)

24. Realme 11 Pro Plus Mobile Details in Marathi

Realme 11 Pro Plus Mobile Details in Marathi 6 August 2023 (mobilemarathi.com)

25. Realme GT Neo 5 Pro 5G Design Leaked

Realme GT Neo 5 Pro 5G Design Leaked – 6 August 2023 (mobilemarathi.com)

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *